युवकांनो, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्यासाठी ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा !

युवा पिढी आणि पालक यांना नम्र विनंती !

पू. संदीप आळशी

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार काही साधक गेली २० – २५ वर्षे ग्रंथनिर्मितीची सेवा करत आहेत. हे साधक आता बर्‍यापैकी स्वयंपूर्णरित्या ग्रंथ सिद्ध करू शकतात. सनातनचे अनुमाने ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ अजून सिद्ध करायचे आहेत. सध्या सेवा करत असलेले साधक आणखी २० – २५ वर्षे सेवा करू शकतात. त्यानंतर हे ग्रंथकार्य सांभाळण्यासाठी पुढच्या पिढीने आतापासूनच ग्रंथसेवेतील सर्व बारकावे, दृष्टीकोन, सात्त्विकतेच्या दृष्टीने मुखपृष्ठे आणि चित्रे सिद्ध करणे इत्यादी सखोलपणे शिकून घेणे आवश्यक आहे. युवा साधकांनी आतापासूनच ही सेवा शिकण्यास प्रारंभ केल्यानंतर पुढे १० – २० वर्षांत ते स्वयंपूर्ण होऊ शकतील. सनातनच्या चैतन्यदायी ग्रंथकार्याची पताका फडकत ठेवण्याचे दायित्व आता सर्वस्वी युवा पिढीचेच आहे. ग्रंथसेवा ही श्रेष्ठ अशा ज्ञानशक्तीच्या स्तराची सेवा असल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून देणारीही आहे. यासाठी युवकांनो, आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ करून घ्या ! पालकांनो, तुम्हीही तुमची मुले आणि नातवंडे यांमध्ये असणारे गुण ओळखून त्यांना या नाविन्यपूर्ण साधना-क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी. ज्यांना समाजामध्ये जाऊन समष्टी साधना करणे शक्य नाही, ते संकलन आणि भाषांतर या सेवा शिकून घरी राहूनही त्या करू शकतात. ग्रंथाची सेवा करणे हीसुद्धा परिणामकारक समष्टी साधना आहे.

संपर्क क्रमांक : ८१८०९६८६४०, (०८३२) २३१२६६४

इ-मेल : [email protected]

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा ४०३ ४०१.’

– पू. संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (१९.७.२०२३)