विधानसभेत संमत झालेले ‘लोकायुक्त’ विधेयक विधान परिषदेत प्रलंबित !

ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे हे गेली ११ वर्षे लोकायुक्त विधेयक आणण्यासाठी धडपड करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेत हे विधेयक एकमताने संमत केले; मात्र उद्धव ठाकरे गटाने हे विधेयक विधान परिषदेत प्रलंबित ठेवले आहे.

स्वराज्य आणि स्वधर्म यांसाठी बलीदान केलेल्या हिंदु छाव्याचे धर्मवीर पद नाकारणे, हा हिंदूंचा अपमान ! – हिंदु महासभा

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.

सुशांतसिंह राजपूत याच्या हत्येमागील सत्य लवकरच बाहेर येईल ! – आमदार नीतेश राणे, भाजप

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाल्याचे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. याचे पुरावे हळूहळू बाहेर पडत आहेत. सुशांतसिंह राजपूत याची हत्याच झाली आहे. यामागील सत्य लवकरच बाहेर येईल, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले आहे.

मराठी विश्व संमेलनात विदेश आणि परराज्य येथील मराठीप्रेमींना एका व्यासपिठावर आणणार ! – दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री

ते म्हणाले, ‘‘६५ वर्षांत असा कार्यक्रम कुणी केला नाही. यावर्षी मर्यादित आर्थिक निधीमध्ये संमेलन करत आहेत. पुढील वेळी अधिक निधी देण्यात येईल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्राप्त झालेले नवीन पुरावे आम्ही केंद्रशासनाकडे सादर करू.

सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण !

३० डिसेंबर या दिवशी सिडको आणि महा मेट्रो यांच्या देखरेखीखाली मेट्रोची चाचणी घेण्यात आली. यामुळे संपूर्ण मार्ग क्र. १ आता लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी चालू होईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये २२ वाहनांची तोडफोड !

गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचे द्योतक ! असे गुन्हेगार कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी यामध्ये लक्ष घालून गुन्हेगारांवर कसा वचक निर्माण होईल ? असे पहावे.

निराधार काश्मिरी हिंदू !

३३ वर्षांत सहस्रो काश्मिरी मुसलमान तरुण आधीचे आतंकवादी तरुण ठार होत असतांनाही आतंकवादी संघटनांमध्ये भरती होत राहिले आणि होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. जोपर्यंत जिहादी मानसिकता आणि जिहादी देश पाकिस्तान यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंचा वंशसंहार होतच रहाणार, हे स्वीकारावेच लागेल !

यवतमाळ येथील बसस्थानकांमध्ये ‘हिरकणी’ कक्ष नावापुरताच !

प्रशासनाकडून सर्व सुविधा देण्याचा आव आणला जातो; मात्र प्रत्यक्षात स्थिती निराळीच असते. प्रशासकीय यंत्रणेत शिक्षापद्धत आवश्यक आहे.

प्रेमास विरोध करणार्‍या वडिलांची मुलगा सोहेल बागवान याच्याकडून हत्या !

३ अल्पवयीन मुलांच्या आईचे अफझल बागवान यांच्याशी प्रेमसंबंध होते, तर ३ अल्पवयीन मुलांमधील एका मुलीचे अफझल बागवान यांचा मुलगा सोहेल याच्याशी प्रेमसंबंध होते.

७ जानेवारीला श्री क्षेत्र अमृतनगर (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री हनुमान उपासना !

प.पू. तोडकर महाराज यांनी चालू केलेल्या आश्रमास १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी १३ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.