साधनावृद्धी शिबिरामध्ये यवतमाळ येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुनंदा हरणे (वय ५३ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

श्रीगुरुकृपेने मला ७ – ८ दिवस ध्यानमंदिरात नामजपाला बसायची संधी मिळाली. त्या वेळी मला प.पू. भक्तराज यांचे गुरु प.पू. अनंतानंद साईश यांच्या कृपेचा वर्षाव होत असल्याची अनुभूती आली.

‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ हे नामजप करत असतांना साधिकेने केलेले भावजागृतीचे प्रयोग अन् त्या वेळी तिला आलेल्या अनुभूती !

जप करतांना देवाने मला सुचवलेले भावजागृतीचे प्रयोग आणि ते करतांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

प्रार्थना करून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा वैखरीतून नामजप करत दुचाकी चालवल्यामुळे अपघात होऊनही गुरुकृपेने रक्षण होणे

तीनही प्रसंगांच्या वेळी गुरुकृपेने माझा वैखरीतून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव’, असा नामजप चालू असल्यामुळे माझे रक्षण झाले’, असे मला जाणवले.

‘अग्‍नीशमन प्रशिक्षणा’च्‍या माध्‍यमातून समष्‍टी साधना करा !

एका छोट्याशा ठिणगीपासून उद़्‍भवलेल्‍या आगीचा शेवट हा छोटाच असतो असे नाही’, या आशयाची एक इंग्रजी म्‍हण आहे. केवळ या म्‍हणीवरून आगीची दाहकता, संहारकता किंवा तिचे भीषण परिणाम यांतील गांभीर्य लक्षात येत नाही; तर आगीचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतलेल्‍यांनाच त्‍याची कल्‍पना असते.

गंभीर स्‍थितीतील रुग्‍णासाठी ‘हृदय-श्‍वसन पुनरुज्‍जीवन तंत्र’ एक संजीवनी !

गंभीर स्‍थितीतील रुग्‍ण म्‍हणजे कोणत्‍याही कारणाने हृदयक्रिया-श्‍वसनक्रिया बंद पडलेला, बेशुद्ध, अत्‍यवस्‍थ किंवा प्रतिसाद न देणारा रुग्‍ण. अशा रुग्‍णाला ‘मूलभूत जीवितरक्षण साहाय्‍य’ करतांना प्रथमोपचारकाने AB-CABS या पद्धतीचा वापर करणे उपयुक्‍त ठरते.

अधर्माचरण हेच आपत्‍काळ येण्‍याचे मूळ कारण !

‘अधर्म घडणे, देव न मानणे, कुलाचारांचे पालन न करणे, देवाची उपासना न करणे इत्‍यादींमुळे देवतांपर्यंत आवश्‍यक ते उपचार, तसेच नैवेद्य पोचत नाही. यामुळे देवता पृथ्‍वीवर संकटे पाठवतात’, असे पुराणांत सांगितले आहे.

देवदिवाळी

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला देवदिवाळी हा सण साजरा केला जातो. देवदिवाळी ही मुख्यत्वे कोकणप्रांतात आणि खानदेशात साजरी केली जाते.

ज्ञान, भक्‍ती आणि कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम म्‍हणजे प्रथमोपचार ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रथमोपचाराशी संबंधित विषयांचे अध्‍ययन, अध्‍यापन आणि सराव करणे हा ज्ञानमार्ग आहे. या अध्‍ययनानुसार योग्‍य आणि उचित कृती करणे अर्थात् ‘योग: कर्मसु कौशलम् ।’ म्‍हणजेच कर्ममार्ग आहे.

आगीच्‍या संदर्भात सूचना

आगीच्‍या संभाव्‍य धोक्‍याविषयी जागरूक आणि सावधान रहाणे, हा अग्‍नीशमनाचे ज्ञान आत्‍मसात करण्‍याचा उद्देश आहे. पुढील लहान-सहान गोष्‍टी आचरणात आणल्‍यास कित्‍येक अपघात टाळले जाऊ शकतात.

अग्‍नीशमनाच्‍या पद्धती

आगीला इंधनापासून वंचित केले किंवा इंधनपुरवठा बंद केला, तर आग त्‍वरित विझते. या पद्धतीला ‘स्‍टार्व्‍हिंग’ असे म्‍हणतात, उदा. गॅसची शेगडी विझवतांना आपण गॅसचा पुरवठा बंद करतो. शेगडी इंधन न मिळाल्‍याने विझते.