राज्‍यातील सर्व नागरिकांनी ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करावी ! – सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे आवाहन

‘आयुष्‍मान भारत डिजिटल मिशन’चा भाग म्‍हणून भारत सरकारने ‘डिजिटल हेल्‍थ कार्ड’ हा उपक्रम चालू केला आहे. राज्‍यातील सर्व नागरिकांसाठी हेल्‍थ कार्ड आवश्‍यक आहे. त्‍यामुळे सर्व नागरिकांनी ‘आभा कार्ड’साठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्‍य विभागाने केले आहे.

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तीपदी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांची नियुक्‍ती !

मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या मुख्‍य न्‍यायमूर्तीपदी २९ जुलै या दिवशी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. राजभवन येथे राज्‍यपाल रमेश बैस यांनी देवेंद्र कुमार उपाध्‍याय यांना न्‍यायमूर्तीपदाची शपथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दौर्‍यासाठी ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्‍ट या दिवशी पुण्‍यात येणार असल्‍याने शहरात कडक बंदोबस्‍त ठेवला आहे. पंतप्रधानांच्‍या सुरक्षेचे दायित्‍व असलेले विशेष सुरक्षा पथक (एस्.पी.जी), ‘फोर्स वन’चे सैनिक अशा एकूण ५ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त आहे.

मिरज येथे ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमात सनातनच्‍या सात्त्विक अत्तराचे वाटप !

अधिक मास अर्थात् पुरुषोत्तम मासानिमित्त ‘ब्राह्मण महिला संघ मिरज’च्‍या वतीने राघवेंद्रस्‍वामी मठात सामूहिक ‘श्रीविष्‍णुसहस्रनाम पठण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यासाठी १०० महिला उपस्‍थित होत्‍या. या सर्व महिलांना ब्राह्मण महिला संघाच्‍या वतीने १५० सनातनच्‍या सात्त्विक अत्तराच्‍या बाटल्‍या देण्‍यात आल्‍या.

राहुरी (अहिल्‍यानगर) येथे शाळकरी मुलींसाठी रचले लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांचे षड्‌यंत्र !

शिकवणीसाठी येणार्‍या इयत्ता सातवी-आठवीतील अल्‍पवयीन मुलींचे धर्मांतर करण्‍याचा, तसेच त्‍यांची मुसलमान तरुणांशी ओळख वाढवण्‍याचा सल्ला हिना मुलींना देत होत्‍या.

श्री विठ्ठल मंदिराच्‍या कार्यकारी अधिकार्‍याने स्‍वत:च्‍या मुलाच्‍या हाताने केला श्री विठ्ठलाचा अभिषेक !

‘सामान्‍य वारकर्‍याला कधीच अभिषेक करता येत नाही, मंदिर कार्यकारी अधिकार्‍यांच्‍या मुलाला अभिषेक का करू दिला ?’, असा प्रश्‍न ‘वारकरी पाईक संघा’ने मंदिर प्रशासनाला विचारला आहे.

महाराष्‍ट्रात आढळले १ सहस्र ६६४ बनावट सीमकार्ड !

बनावट सीमकार्डद्वारे होणार्‍या सायबर गुन्‍हेगारीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बनावट सीमकार्ड वापरून आर्थिक लूट केल्‍याप्रकरणी महाराष्‍ट्रात १८ गुन्‍हे नोंदवण्‍यात आले असून यामध्‍ये तब्‍बल १ सहस्र ६६४ बोगस सीमकार्ड वितरीत करण्‍यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे.

पुणे येथे आतंकवाद्यांच्‍या घरातील पंख्‍याच्‍या पाईपमध्‍ये सापडली बाँब बनवण्‍याची माहिती !

कोथरूड येथे पकडलेल्‍या २ आतंकवाद्यांच्‍या घरातून आतंकवादविरोधी पथकाला (‘ए.टी.एस्.’ला) कागद सापडला आहे. घरातील पंख्‍याच्‍या पाईपमध्‍ये हा कागद लपवून ठेवण्‍यात आला होता.

(म्हणे) ‘संपूर्ण जगाचे लक्ष मणीपूरकडे लागले आहे !’ – काँग्रेसी नेते अधीर रंजन चौधरी

मणीपूरवरून काही आठवड्यांपूर्वी अमेरिकी राजदूताने केलेल्या विधानाचा निषेध करणारी काँग्रेस आज अमेरिकेचीच भाषा बोलत आहे ! भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांना आंतरराष्ट्रीय बनवण्याचा प्रयत्न करणार्‍या अशा काँग्रेसी नेत्यांना आता भारतियांनी धारेवर धरले पाहिजे !

महाविद्यालयाचे व्यवस्थापक अब्दुल खादर यांनी संपूर्ण प्रकाराला ‘प्रँक’ संबोधून दुर्लक्ष करण्यास सांगितले !

जर हिंदु विद्यार्थिनींनी धर्मांध विद्यार्थिनींची अश्‍लील व्हिडिओ बनवले असते, तर अब्दुल खादर यांनी त्याला ‘प्रँक’ म्हटले असते का ?