पुणे येथे आतंकवाद्यांच्‍या घरातील पंख्‍याच्‍या पाईपमध्‍ये सापडली बाँब बनवण्‍याची माहिती !

पुणे – कोथरूड येथे पकडलेल्‍या २ आतंकवाद्यांच्‍या घरातून आतंकवादविरोधी पथकाला (‘ए.टी.एस्.’ला) कागद सापडला आहे. घरातील पंख्‍याच्‍या पाईपमध्‍ये हा कागद लपवून ठेवण्‍यात आला होता. या कागदावर बाँब बनवण्‍याची माहिती लिहिली होती. यासह अ‍ॅल्‍युमिनियमचे पाईप, काचा आणि ‘बुलेट्‌स’ हे साहित्‍यही घराच्‍या छतामध्‍ये सापडले आहे. कोंढवा येथे महंमद इम्रान महंमद युसूफ खान आणि महंमद युनूस महंमद याकुल साकी हे दोघे आतंकवादी रहात होते. आतापर्यंत त्‍यांच्‍या घरातून ‘लॅपटॉप’, ‘टॅब’, वजनकाटा, ‘ड्रोन’, नकाशा, ‘बॅटरी सेल’, ‘इलेक्‍ट्रॉनिक्‍स सोल्‍डरींग गन’, ‘केमिकल पावडर’ आणि उर्दू आणि अरबी भाषांतील पुस्‍तके इत्‍यादी साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले आहे.