श्री विठ्ठल मंदिराच्‍या कार्यकारी अधिकार्‍याने स्‍वत:च्‍या मुलाच्‍या हाताने केला श्री विठ्ठलाचा अभिषेक !

वारकरी संप्रदायात अप्रसन्‍नता

पंढरपूर (जिल्‍हा सोलापूर) – येथील श्री विठ्ठल मंदिराचे कार्यकारी अधिकारी आणि उपजिल्‍हाधिकारी राजेंद्र शेळके यांनी स्‍वत:च्‍या मुलाकडून श्री विठ्ठलाचा अभिषेक करून घेतला आहे. याविषयी ‘वारकरी पाईक संघा’ने ‘सामान्‍य वारकर्‍याला कधीच अभिषेक करता येत नाही, मंदिर कार्यकारी अधिकार्‍यांच्‍या मुलाला अभिषेक का करू दिला ?’, असा प्रश्‍न ‘वारकरी पाईक संघा’ने मंदिर प्रशासनाला विचारला आहे. (याविषयी मंदिर प्रशासनाने खुलासा करण्‍याची आवश्‍यकता आहे. – संपादक)

विषमता दूर होण्‍यासाठी मंदिराचे सरकारीकरण रहित करा ! – रामकृष्‍ण वीर महाराज, वारकरी संप्रदाय पाईक संघ

विषमता दूर होण्‍यासाठी मंदिराचे सरकारीकरण रहित व्‍हायला हवे आणि स्‍वत:च्‍या अधिकारांचा अपलाभ करून घेणार्‍या मंदिर प्रशासनातील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी. यापूर्वीही मंदिरातील अयोग्‍य वर्तणुकीमुळे अधिकार्‍यांना गाभार्‍यात बंदी करण्‍यात आली होती. आताही तशा पद्धतीने कारवाई अधिकार्‍यांवर व्‍हावी, अशी मागणी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे श्री. रामकृष्‍ण वीर महाराज यांनी केली आहे.