मॉस्को येथे ड्रोनद्वारे होणारे युक्रेनचे आक्रमण उधळल्याचा रशियाचा दावा !

मॉस्को शहराचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी दावा केला, ‘येथे रात्री ड्रोनद्वारे २ इमारतींवर आक्रमण करण्यात आले. यात जीवित हानी झालेली नाही.

सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प

जिल्ह्यात गेले ४ दिवस पावसाची संततधार चालूच आहे, तसेच वादळी वारेही वहात आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदी, नाले यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गोवा : डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर

राज्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. डिचोली, पेडणे आणि सत्तरी तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तसेच गावांचा संपर्क तुटला आहे. बर्‍याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गोव्यातील जलस्रोत खात्याच्या अभियंत्याची कळसा प्रकल्पाला भेट

कर्नाटक सरकार कळसा-भंडुरा प्रकल्पांच्या माध्यमातून म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू पहात आहे. कर्नाटकने हल्लीच सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) केंद्राला सुपुर्द केला आहे आणि केंद्रीय जलआयोगाने त्याला संमतीही दिली आहे !

अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यवतमाळ जिल्‍ह्यात पावसाचे तांडव !

जिल्‍ह्यात ६ दिवसांपासून चालू असलेली पावसाची रिपरिप २० जुलैपासून जोराच्‍या पावसात रूपांतरित झाली. २१ जुलैच्‍या रात्री जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यांमध्‍ये मोठा पाऊस येऊन अनेक तालुक्‍यात अतीवृष्‍टी झाली; मात्र यवतमाळ शहरात ३०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. लहान मोठ्या सर्व नद्या, नाले तुडुंब भरले असून सहस्रो हेक्‍टरवरील पिके पाण्‍यात बुडाली आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईत ‘सेवा दिवस’ साजरा !

उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष संदीप नाईक यांच्‍या मार्गदर्शनाखाली आणि त्‍यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीमध्‍ये नवी मुंबई भाजपच्‍या वतीने सर्वत्र सेवा दिवस साजरा करण्‍यात आला.

अमरावती येथे ‘कलश जागृती यात्रे’त सनातनचा सहभाग

या कलश यात्रेचा उद्देश ‘घराघरात यज्ञ व्‍हावे, गोमातेला राष्‍ट्रमाता म्‍हणून घोषित करण्‍यात यावे आणि ‘संस्‍कृत भाषा हीच आपली संस्‍कृती आहे’ याचा प्रचार करणे हा आहे’, असे आयोजक श्री. प्रकाश सिरवानी यांनी या वेळी सांगितले.

राज्‍यभरात पावसामुळे धरणे, नद्या-नाले दुथडी भरून वाहिले !

राज्‍यात जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्या-नाले दुथढी भरून वहात आहेत. विदर्भातील काही जिल्‍ह्यांत पूरस्‍थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्‍ये पाणी शिरले आहे. लोणावळ्‍यात भूशी धरण पूर्ण भरून वहात आहे.