
नवी मुंबई, २३ जुलै (वार्ता.) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी मुंबई भाजपच्या वतीने सर्वत्र सेवा दिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण शहरभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना विकासाची दृष्टी लाभली आहे. त्यांचा विचार जनकल्याण आणि महाराष्ट्र हिताचा आहे. त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करत आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत रुग्ण मित्र योजनेत बेलापूर गाव आणि करावे येथे फळवाटप करण्यात आले. सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टमध्ये फळवाटप केले. वंडर्स पार्क येथे वृक्षारोपण केले.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !