गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक
गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.
गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.
सोहळ्यामध्ये ते धातूवर कोरलेले उत्तराधिकार पत्र सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रदान केले. सनातनच्या गुरुपरंपरेतील हे अनमोल क्षण साधकांनी भावपूर्णरित्या अनुभवले. श्री. विनायक शानभाग यांनी उत्तराधिकार पत्राचे वाचन केले.
रथारूढ महाविष्णूची गायन, वादन आणि नृत्य यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! श्रीविष्णुरूपात रथात विराजमान असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी कलेच्या माध्यमातून भाव अर्पण केला.
‘देव भावाचा भुकेला असतो’, याची प्रचीती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि प.पू. आपटेआजी यांच्या भेटीच्या वेळी उपस्थित साधकांना आली.
ब्रह्मोत्सवाला आलेल्या सर्व साधकांच्या चेहर्यावर भाव, आनंद आणि उत्साह ओसंडून वहात होता. प्रत्येक जण स्वयंस्फूर्तीने सोहळा सुंदर होण्यासाठी प्रयत्न करत होता.