तिन्ही मोक्षगुरूंनी परिधान केलेल्या वस्त्रालंकारांचे महत्त्व  

सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांच्या ठिकाणी साक्षात् श्रीमन्नारायणाचे तेजस्वरूप असणारा सूर्यनारायणच त्याच्या सात पांढर्‍या अश्वांच्या रथावर आरूढ होऊन भूलोकी अवतरणार होता. त्यामुळे सूर्यनारायणाचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपित करणारे केशरी किंवा भगव्या रंगाचे वस्त्र सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवले यांनी परिधान केले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवरूपी’ ८१ व्या जन्मोत्सवाचे  कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

वैशाख कृष्ण पक्ष षष्ठीच्या शुभतिथीला फर्मागुडी, गोवा येथील मैदानावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सवा’च्या रूपात अत्यंत हर्षाेल्हासात साजरा झाला. हा सोहळा इतका भव्य आणि दिव्य होता की, या सोहळ्याला उपस्थित असणार्‍या साधकांना हा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ पाहिल्याचे पूर्ण समाधान लाभले.

टाळ मृदुंग वीणा हाती घेवू । श्रीमन्नारायणा तुझे गुण गाऊ ॥

ब्रह्मोत्सवात गुरुचरणी टाळनृत्य !

टाळ मृदुंग आनंदे गर्जती । दिगंत करती श्रीमन्नारायणाची कीर्ती ॥

ब्रह्मोत्सवात गुरुचरणी वादनसेवा !

असा पार पडला दिव्य ‘ब्रह्मोत्सव’ !

श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने झालेला हा दिव्य आणि भव्य ‘ब्रह्मोत्सव’ ‘याची देही, याची डोळा’ पहाण्याचे महत्भाग्य साधकांना लाभले’, यासाठी हे भगवंता, तुझ्या चरणी अनन्य भावे, कृतज्ञता ! कृतज्ञता !! कृतज्ञता !!!

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी संत आणि मान्यवर यांनी अर्पिलेली कृतज्ञतासुमने !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला अनेक संत, मान्यवर आणि हितचिंतक उपस्थित होते. त्यापैकी काहींनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत देत आहोत. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ निर्विघ्नपणे पार पडावा आणि त्याचा साधकांना चैतन्याच्या स्तरावर लाभ व्हावा, यांसाठी केलेले आध्यात्मिक उपाय

ब्रह्मोत्सवाची ईश्वराला अपेक्षित अशी फलनिष्पत्ती साध्य व्हावी, यांसाठी ईश्वराने सुचवलेले उपाय

तुझी सेवा करीन मी मनोभावें वो । माझें मन गोविंदीं रंगलें वो ॥

ब्रह्मोत्सवातील आर्त गायनसेवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्याविषयी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितलेली सूत्रे !

‘२३.२.२०२३ या दिवशी सप्तर्षी नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून झालेल्या नाडीवाचन क्रमांक २२२ मध्ये ‘वर्ष २०२३ मध्ये गुरुदेवांचा जन्मोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पाहोनी ही गुरुमूर्ती मनोहर । दाटे कंठ लागे डोळियां पाझर ।

ब्रह्मोत्सवात गुरुदर्शनाने भावभक्तीचा जागर !