(म्हणे) ‘येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद आणि दया यांमुळे आपण कोरोनाला पराजित करू शकलो !’
तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांचे विधान !
तेलंगाणा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव यांचे विधान !
बहुचर्चित अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील दिशा सालियान हत्या प्रकरणाची विशेष अन्वेषण यंत्रणेद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन’द्वारे केली
अशांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
विधानसभेच्या अध्यक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित रहाता येणार नाही.
नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरणमधील भूखंड प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती २९ मे २०१८ या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पत्राद्वारे नगरविकास प्रधान सचिवांना दिली होती, हे सिद्ध करणारे पत्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानभवनात पत्रकारांना दाखवले.
दिशा सालियन हिच्या मृत्यूविषयी कुणाकडे काही पुरावे असतील, तर ते सादर करावेत. दिशा हिच्या हत्येची चौकशी विशेष पोलीस पथकाद्वारे करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ डिसेंबर या दिवशी सभागृहात केली.
कोरोना साहाय्य निधीची रक्कम २ सहस्र ५०० रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी संबंधित सर्व विभागांची मान्यता प्राप्त झाली आहे. येत्या ३ मासांत ही रक्कम २ सहस्र ५०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिले.
गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत, ‘शाळांमध्ये गळती होत आहे’ मात्र सध्या निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.
अभिनेता सुशांत राजपूत यांनी भ्रमणभाषवरून दिशा सालियन हिला काही माहिती पाठवली होती. त्यामुळे तिची हत्या करण्यात आली का ? याविषयी पुनर्अन्वेषण करून या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यात यावे.
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर तालिका सभापतींनी १५ मिनिटांसाठी विधान परिषदेचे कामकाज स्थगित केले.