मोठ्या नेत्याला वाचवण्यासाठी ‘सीसीटीव्ही फुटेज डिलीट’ केल्याचा गंभीर आरोप !

नागपूर, २२ डिसेंबर (वार्ता.) – दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या वेळी तेथे एक तत्कालीन मंत्री उपस्थित होते. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या मंत्र्यांची छायाचित्र होती; मात्र ती पुसून टाकण्यात आली आहेत, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी २२ डिसेंबर या दिवशी विधानसभेत केला. या वेळी झालेल्या गोंधळामुळे तालिका सभापती संजय शिरसाट यांनी ३ वेळा ४५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिशा सालियन हिने आत्महत्या केली कि, तिला इमारतीवरून फेकून देण्यात आले ? याची चौकशी व्हावी. तिने सुशांत राजपूत याच्याशी भ्रमणभाषवरून केलेले संभाषणाची माहिती उघड करण्यात यावी, अशी मागणी केली. हे सूत्र सभागृहात उपस्थित करून दिशा सालियन हिच्या मृत्यूचे सखोल अन्वेषण करून सत्य जनतेपुढे मांडण्याचा आवाहन केले. या वेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांच्या दालनापुढे येऊन पुरावे नष्ट केल्याचा निषेध व्यक्त करत चौकशीची मागणी केली.
काल शेवाळेंनी, आज गोगावलेंनी घेरलं, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणेंनी तर थेट आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टचीच मागणी केलीhttps://t.co/Vdt4k4vR5n@AUThackeray @NiteshNRane @BharatGogawale @shewale_rahul
— Maharashtra Times (@mataonline) December 22, 2022
‘सीसीटीव्ही फुटेज’ का डिलीट करण्यात आले ? याची चौकशी व्हावी !
दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मुंबई पोलिसांना प्राप्त झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून नेमके काय डिलिट करण्यात आले, हे कळायला हवे. या प्रकरणातील चौकशी अधिकारी २ वेळा पालटण्यात आला. अभिनेता सुशांत राजपूत यांनी भ्रमणभाषवरून दिशा सालियन हिला काही माहिती पाठवली होती. त्यामुळे तिची हत्या करण्यात आली का ? याविषयी पुनर्अन्वेषण करून या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करण्यात यावे. मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता ? कोणत्या ताकदीचा माणूस तेथे होता की, त्यामुळे त्याला वाचवले जात आहे ? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली.
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
आतंकवाद्यांचे समर्थन करणार्यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्याचे कौतुक
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !