मुंबई – शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यांनतर नवीन चिन्हाविषयी चर्चा चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘नवीन चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. आमच्यात शिवसेनेचे ‘स्पिरीट’ आहे’, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कारागृहात असलेले खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी १० ऑक्टोबर या दिवशी संपली होती. त्यांना ‘ईडी’च्या विशेष पी.एम्.एल्.ए. न्यायालयात नेत असतांना ते शिवसैनिकांशी बोलत होते.