‘मध्यान्ह भोजन योजना’ बंद करण्यासाठी बीडमध्ये कामगारांचा भव्य मोर्चा !

बीड – ‘मध्यान्ह भोजन योजना’ बंद करून प्रत्येक कामगाराच्या खात्यावर प्रतिमास २ सहस्र रुपये द्यावेत या मागणीसाठी बीडमधील बांधकाम कामगारांनी कामगार कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. कामगारांच्या हितासाठी राज्यशासनाकडून ‘मध्यान्ह भोजन योजना’ राबवण्यात येत आहे; मात्र या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याचा लाभ या कामगारांना होत नसल्याने ही योजना बंद करावी, अशी मागणी कामगारांनी मोर्च्याद्वारे केली. (सरकारची एक तरी योजना भ्रष्टाचार विरहित आहे का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून यातील अडचणी का सोडवत नाही ?