मुंबई – जिल्हा न्यायालयांमध्ये ४ कोटी, उच्च न्यायालयांमध्ये १ कोटीहून अधिक आणि सर्वोच्च न्यायालयात ७२ सहस्र खटले प्रलंबित आहेत. नेहमीच्या प्रक्रियेने हे खटले मार्गी लागणे अशक्य आहे. त्यामुळे न्यायालयात जाऊन न्याय मिळतोच, असे नाही, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी केले आहे. ‘यशवंतराव चंद्रचूड स्मृती व्याख्यानमाले’त ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,
१. न्यायदानाच्या क्षेत्रातील अधिवक्ते, न्यायाधीश, न्यायमूर्ती, घटनातज्ञ यांनी सामान्य माणसाला समजेल, अशा भाषेत कायदा सांगणे आवश्यक आहे.
२. गेल्या काही वर्षांत अधिवक्ता क्षेत्राचे रूपांतर व्यवसायाकडून व्यापारात झाले आहे.