मुंबईत दहीहंडी उत्सवात १५३, तर ठाणे येथे ६४ गोविंदा घायाळ !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – दहीहंडी उत्सवात १९ ऑगस्ट या दिवशी दिवसभरात मुंबई येथे १५३ गोविंदा घायाळ झाले होते. त्यांपैकी १३० जणांना उपचार करून सोडून देण्यात आले, तर उर्वरित २३ जण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या गोविंदांना खरचटणे, पाय दुखावणे, मुका मार लागणे, खांदा निखळणे, स्नायू दुखावणे असे त्रास झाले आहेत.

ठाणे येथे दहीहंडी फोडण्यासाठी थर रचतांना ६४ गोविंदा घायाळ झाले. यांपैकी ५२ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. अन्य घायाळ गोविंदांवर उपचार चालू आहेत. नौपाडा येथे रहाणारे संतोष शिंदे (वय ५२ वर्षे) हे प्रभात सिनेमा येथे दहीहंडीचे थर लावतांना पडले होते. ते बेशुद्ध झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत.