भरतपूर (राजस्थान) येथील अवैध उत्खननाच्या विरोधात आत्मदहन करणारे संत विजय दास यांचे निधन

संतांच्या मृत्यूला राजस्थानमधील काँग्रेस सरकारच उत्तरदायी आहे. त्याने कितीही कठोर प्रायश्चित्त घेतले, तरी ते अल्पच आहे. आता जनतेनेच काँग्रेस सरकारला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे !

नीरव मोदी यांची २५३ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाकडून कह्यात !

महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँकेमधील आर्थिक अपहारातील आरोपी आणि हिर्‍याचे व्यापारी नीरव मोदी यांची २५३ कोटी ६२ लाख रुपयांची ‘हाँगकाँग’मधील मालमत्ता केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील कारागृहात आहेत.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पर्यटकांची लूट !

राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पर्यटकांची लूट होत आहे. नागरिकांना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. चारचाकी वाहनासाठी प्रतिघंटा १४ रुपये शुल्क असतांना ३० रुपये, तर दुचाकीसाठी ३ रुपयांऐवजी १० रुपये शुल्क आकारले जाते.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पायरी मार्गावरील तटबंदी कोसळली !

सततच्या अतीवृष्टीमुळे श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पायरी मार्गावरील तटबंदी कोसळली आहे. समर्थ महाद्वार ओलांडून गेल्यानंतर डाव्या हाताला पायरी मार्गावर काही वर्षांपूर्वीच ही तटबंदी करण्यात आली होती. याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी दुर्गप्रेमी आणि भाविक यांच्याकडून केली जात आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप !

देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याविषयी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळकरी विद्यार्थिनींना भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटन सरचिटणीस दीपक माने, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, शेखर इनामदार यांसह अन्य उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालय आणि क्षेत्रीय कार्यालये येथे प्रतिदिन सकाळी राष्ट्रगीत लावणार !

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेचे पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या दिवशी प्रतिदिन सकाळी १० वाजता राष्ट्रगीत लावले जाणार आहे.

कारखान्याचे रसायनयुक्त पाणी मिसळले गेल्याने कृष्णा नदीत सहस्रो मासे मृत्यूमुखी !

गेल्या आठवड्यापासून कृष्णा नदीत रसायनयुक्त पाणी मिसळले गेल्याने कसबे डिग्रज परिसरात सहस्रो मासे मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले आहे. नदीला वाढलेले पाणी आणि पावसाच्या पाण्याचा लाभ घेऊन कारखान्यांनी रसायनयुक्त पाणी सोडल्याने मासे, तसेच अन्य जलचर जीव मृत्यूमुखी पडले आहेत.

वैद्यकीय अधिकार्‍यांचे वेतन नियमित न झाल्यास आंदोलन ! – महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटना

कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांचे वेतन गेल्या वर्षभरात कधीच वेळेवर झालेले नाही. सध्या नियमित वैद्यकीय अधिकार्‍यांपैकी ४० अधिकार्‍यांचे ‘मे’पासूनचे वेतन प्रलंबित आहे, तसेच कंत्राटी २५ वैद्यकीय अधिकार्‍यांना फेब्रुवारीपासूनचे वेतन मिळालेले नाही.

सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा नियंत्रकांनी परीक्षांतील त्रुटी सुधाराव्यात !

परीक्षांमध्ये घोडचुका करणार्‍या विद्यापिठातील संबंधितांना बडतर्फ करायला हवे !

तुळजापूर येथील घाटशीळ मंदिराचे शिखर आणि तटबंदी यांवर झुडुपे उगवत असल्याने वास्तूला धोका !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील अतीप्राचीन असलेल्या घाटशीळ मंदिराच्या परिसरातील शिखर आणि तटबंदी यांवर लहान आकाराची झुडुपे उगवली आहेत.