राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पर्यटकांची लूट !

कात्रज (पुणे) येथील घटना !

कात्रज (पुणे) – राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील वाहनतळाच्या ठेकेदाराकडून पर्यटकांची लूट होत आहे. नागरिकांना ठेकेदाराच्या दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. चारचाकी वाहनासाठी प्रतिघंटा १४ रुपये शुल्क असतांना ३० रुपये, तर दुचाकीसाठी ३ रुपयांऐवजी १० रुपये शुल्क आकारले जाते. ठेकेदाराच्या कामावर महापालिका अधिकार्‍यांचे नियंत्रण नसल्याने ही लूटमार चालू आहे. पर्यटकांनी देयकाच्या पावतीची मागणी केल्यास तिच्यावर शुल्काची रक्कम न घालता केवळ दिनांक आणि वेळ नमूद असलेले देयक दिले जाते. वाहनतळाच्या ठेकेदाराने नियमानुसार शुल्कआकारणी करणे बंधनकारक असून तपासणी केल्यानंतर ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी संगितले.

संपादकीय भूमिका

अशा उद्दाम ठेकेदारांची मनमानी थांबवण्यासाठी आतापर्यंत त्यांनी केलेली पर्यटकांची लूट त्यांच्याकडूनच सव्याज वसूल करायला हवी !