मुंबई – महाराष्ट्र पंजाब नॅशनल बँकेमधील आर्थिक अपहारातील आरोपी आणि हिर्याचे व्यापारी नीरव मोदी यांची २५३ कोटी ६२ लाख रुपयांची ‘हाँगकाँग’मधील मालमत्ता केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. नीरव मोदी सध्या ब्रिटनमधील कारागृहात आहेत.
पंजाब नॅशनल बँकेतील अपहाराच्या प्रकरणात मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत मोदी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. भारत सरकारने नीरव मोदी यांना फरार घोषित केले आहे. भारत सरकारकडून ब्रिटन सरकारशी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू आहे.