सर्व विश्वाला व्यापून टाकणार्या आकाशापेक्षाही पिता हाच श्रेष्ठ !
प्रत्येक मुलाने, पुत्राने आपला पिता, जनक, तात यालाच दैवत मानून त्याची मनोभावे सेवा करावी. वृद्ध आणि व्याधीग्रस्त पित्याकडे दुर्लक्ष करून किंवा त्याला वृद्धाश्रमात पाठवून मुलाने पापातच वाढ केलेली असते, हे तरुणांनी कधीही विसरू नये.’