२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प.पू. कलावतीआई यांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ १ वर त्यांना नमन करणारी चौकट प्रसिद्ध करण्यात आली. त्यात प.पू. कलावतीआई यांचा उल्लेख अनवधानाने ‘पू. कलावतीआई’ असा करण्यात आला आहे. यासाठी आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. प.पू. कलावतीआई यांनी आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी ‘सनातन प्रभात’ला नितांत आदरच आहे. झालेल्या चुकीविषयी संबंधित कार्यकर्ते प्रायश्चित्त घेत आहेत.