अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या मौलानाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

येथील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे सदर मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर आरोपीला ३० जुलै २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती.

‘पब्जी’साठी १६ वर्षीय मुलाकडून आईच्या अधिकोषाच्या खात्यातून १० लाख रुपये खर्च !

पालकांनो, आपली मुले भ्रमणभाषवर नेमके काय पहातात, याकडे वेळीच लक्ष द्या आणि त्यांना ‘पब्जी’सारख्या खेळांच्या व्यसनांपासून दूर ठेवा !

मुंबईच्या सुरक्षेसाठी वातावरणीय पालट कृती आराखडा सिद्ध !

उपाययोजना न काढल्यास पुढील १० वर्षांत मुंबई रहाण्यासाठी अयोग्य ठरण्याची भीती !

वातावरणातील पालटामुळे वर्ष २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली जाईल ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

वातावरणातील पालट, चक्रीवादळ आणि अवेळी पडणारा पाऊस लक्षात घेतला, तर वर्ष २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली असेल. त्यात मुंबई महापालिकेच्या ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या ४ प्रभागांचा समावेश आहे,

कपिलेश्वरी, फोंडा येथे युवतीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी वरभाट, कवळे येथील युवक पोलिसांच्या कह्यात

असे पोलीस काय कामाचे ? गृहमंत्रीपद सांभाळणार्‍या मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

दहीहंडी, गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन !

गणेशोत्सवाविषयी विभागीय पातळीवर अहवाल मागवून पुढील निर्णय घेण्यात येईल. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाविषयी स्वतंत्र अहवाल सिद्ध केला जाईल.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन न करण्याच्या याचिकेवर ३१ ऑगस्ट या दिवशी सुनावणी !

तातडीने भूमिका स्पष्ट करण्यासाठी मूर्तीकारांचे शासनाला आवाहन

युवतीचा खून केल्याच्या प्रकरणी रशियाचा नागरिक पोलिसांच्या कह्यात

शिवोली येथे रशियातील युवतीच्या मूत्यू प्रकरणाला कलाटणी

महाराष्ट्रात येत्या ४ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता !

महाराष्ट्रात ३० ऑगस्टपासून ४ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परभणी, नाशिक, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत ‘ऑरेंज ॲलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.

उल्हासनगर येथील शासकीय बालसुधारगृहातील १४ मुलांना कोरोनाची लागण !

उल्हासनगर येथील कॅम्प क्र. ५ येथील शासकीय बालसुधारगृहात २५ मुले असून यापैकी १४ मुलांना खोकला आणि उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केल्यावर ती ‘पॉझिटिव्ह’ आली.