सोलापूर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा २८ वर्षीय मौलाना मोहसिन अहमद निसार अहमद शेख याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. येथील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे सदर मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर आरोपीला ३० जुलै २०२१ या दिवशी अटक करण्यात आली होती. आरोपीने त्याला जामीन मिळावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यु.एल्. जोशी यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. (मौलानाचे खरे स्वरूप ओळखा ! अशा प्रकारे गैरवर्तन करणार्या मौलानांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)
मुलगी १५ जुलै २०१७ या दिवशी आरोपी मौलानाने तिच्यासमवेत विवाह केला. त्या वेळी पीडित युवतीचे वय केवळ १५ वर्षे ९ मास होते. आरोपीची कसून चौकशी केली असता त्याचा पहिला विवाह झाला असून ही गोष्ट पीडितेपासून लपवली आणि पीडितेसमवेत प्रेमाचे खोटे नाटक करून बळजोरीने विवाह करून तिच्यावर अत्याचार केले होते. सदर आरोपीच्या विरोधात पोलिसांनी ‘लुकआऊट’ नोटीस काढली होती. अधिवक्ता प्रदीपसिंह राजपूत यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून यातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
सरकारी अधिवक्ता प्रदीपसिंह राजपूत यांनी केलेला युक्तीवाद
सदर आरोपी हा यापूर्वी सौदी अरेबिया येथे पळून गेला होता. आरोपीला जामिनावर सोडल्यास तो कायमस्वरूपी देश सोडून जाण्याची शक्यता आहे. आरोपी मुसलमान समाजाचा, तसेच धर्मगुरुपदाचा गैरवापर करू शकतो. तो सरकारी साक्षीदारांना धमकावून सरकार पक्षाचा पुरावा फोडू शकतो. सदरचा अपराध हा गंभीर स्वरूपाचा असल्याने या आरोपीस जामीन देण्यात येऊ नये.