उपाययोजना न काढल्यास पुढील १० वर्षांत मुंबई रहाण्यासाठी अयोग्य ठरण्याची भीती !
मुंबई – मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेने ‘वातावरणीय पालट कृती आराखडा’ (‘क्लायमेट चेंज ॲक्शन प्लान’) सिद्ध केला आहे. यामध्ये अतीवृष्टी, पाणी का तुंबते, उष्णतावाढ या कारणांचा शोध घेऊन शुद्ध हवा, पर्यावरण रक्षण यांसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
वातावरणातील पालटामुळे मुंबईत गेल्या वर्षापासून अनेक वेळा आपत्कालीन स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आता तरी ठोस निर्णय घेऊन उपाययोजना आणि कृती करण्याची आवश्यकता आहे; अन्यथा पुढील १० वर्षांत मुंबई रहाण्यासाठी अयोग्य ठरेल, अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.