काँग्रेसची सांखळी येथील ‘भूमीपुत्र’ यात्रा रहित

‘भूमीपुत्र अधिकारिणी विधेयका’ला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षाने २९ ऑगस्ट या दिवशी सांखळी येथे ‘भूमीपुत्र’ यात्रेचे आयोजन केले होते; मात्र या यात्रेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादल्याने काँग्रेसने ही यात्रा रहित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी शंखनाद आंदोलन !

आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचे भाजपचे आवाहन

कोकणात उद्योगांचे जाळे निर्माण झाले, तर माझे मंत्रीपद सार्थकी लागेल ! – नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती.

श्री गणेशमूर्तीवरील शासकीय अनुदानात वाढ करा ! – पारंपरिक श्री गणेशमूर्तीकारांची मागणी

श्री गणेश मूर्तीकार म्हणाले, ‘‘आम्ही प्रत्येक श्री गणेशमूर्ती ५०० ते ८०० रुपयांपर्यंत विकतो, तरीही गावातील लोक मूर्तीचा दर अल्प करण्याची मागणी करत असतात.

पर्वरी येथे एका खासगी रुग्णालयात सेवेला असलेल्या एका आधुनिक वैद्यांना मारहाण : दोषीवर कारवाई करण्याची मागणी

पर्वरी येथे एका खासगी रुग्णालयात सेवेला असलेल्या एका आधुनिक वैद्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ‘भारतीय वैद्यकीय संघटने’चे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी केली आहे.

गहाळ वस्तू किंवा कागदपत्रे यांची तक्रार करतांना शपथपत्राची मागणी करणार्‍या पोलिसांवर कारवाई करणार ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

शपथपत्राची मागणी करणे म्हणजे तक्रारदाराची अडवणूक करणे होय. अशा प्रकारे शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही.

शाडूमातीचा पर्याय सर्वाेत्तम !

पाण्यात विरघळतील अशा मातीच्या मूर्ती बनवण्याचा पर्याय मूर्तीकारांकडे आहे’, असे सांगून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ‘पोओपी’ मूर्तीकार संघाचे अध्यक्ष विनोदकुमार गुप्ता यांची याचिका फेटाळली आहे.

आरोग्य विभागातील २१ आरोग्यसेविकांची पदे रहित होऊ नयेत, यासाठी प्रसंगी आंदोलन करू ! – डॉ. अनिषा दळवी, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग 

कौशल्य यांच्या आधारे जिल्ह्यातील रिक्त पदांवर यांचे समायोजन करावे, तसेच वयाची अट शिथिल करून भरती प्रक्रियेत ४० टक्के आरक्षण द्यावे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ५४ नवीन रुग्ण

जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ५४ नवीन रुग्ण आढळले, तर चौघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३५१ झाली आहे.

मालवण येथे आज तेली समाज उन्नती मंडळाची सर्वसाधारण सभा

तेली समाज उन्नती मंडळ, मालवणच्या सर्व आजीव सभासदांची सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता संत पादुका मंदिर, देऊळवाडा, मालवण येथे आयोजित केली आहे.