‘२२.९.२०२० या दिवशी मी दुर्गादेवीचा जप करत असतांना ध्यानात ‘मी खंडोबाला चालले आहे’, असे मला दिसले. तिथे ११ पायर्यांवर ११ नारळ फोडून मंदिरात जावे लागते. डोंगरावर आणि मंदिरात जात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ दिसल्या. परात्पर गुरुदेवांनी डोक्याला फेटा बांधलेला होता. त्यांनी सदरा आणि धोतर असा पोषाख घातला होता. त्यांच्या डाव्या खांद्यावर घोंगडे होते. त्यांच्या कपाळावर हळदीचा मळवट आणि कुंकवाचे नाम होते. त्यांचा वेश श्री खंडोबाप्रमाणे होता. उजव्या बाजूला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि डाव्या बाजूला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ होत्या. त्यांनी गावठी साडी नेसली होती. त्यांनी कपाळावर हळदीचा मळवट आणि कुंकवाचा टिळा लावलेला होता. डोंगर चढत असतांना परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘अगं बाई, कुठे चाललीस ? थांब.’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘एवढा डोंगर चढू नकोस. आम्हीच तुझे कुलदैवत आहोत.’ तेव्हा मी म्हणाले, ‘हो का ? तुम्हीच माझे कुलदैवत आहे का ? मी तुमच्या चरणी वंदन करते.’ नंतर मी एका मोठ्या झाडाखाली चटई टाकली आणि त्या तिघांना बसवून भोजन वाढले. मी त्यांना म्हटले, ‘माझी पूजा तुुम्ही स्वीकारा आणि आनंदाने भोजन करा.’ नंतर त्यांनी आनंदाने भोजन केले. ‘माझी पूजा मानून घ्या’, असे म्हणून मी देवाच्या चरणी नतमस्तक झाले.’
– श्रीमती ताराबाई व्हनमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |