पुढच्या ७ पिढ्यांचा विचार करून महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी आणावी !  – सत्यजित तांबे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस

फटाक्यांच्या विक्रीतून मिळणार्‍या महसुलाऐवजी फटाक्यांमुळे होणारे वायूप्रदूषण, ध्वनीप्रदूषण, अपघात आणि अनावश्यक व्यय यांचा विचार करून केंद्रशासनाने संपूर्ण देशात फटाक्यांवर कायमची बंदी आणण्याचा निर्णय त्वरित घ्यावा !

भारताने घुसखोरीपूर्वीच जिहाद्यांवर आक्रमण करावे !

पाकमधून २५० ते ३०० जिहादी आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत; मात्र भारतीय सैन्य आणि आम्ही त्यांना रोखण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहोत, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राजेश मिश्रा यांनी दिली.

नरकचतुर्दशीच्या दिवशी करतो श्रीकृष्णाचा विजयोत्सव साजरा ।

नरकचतुर्दशीच्या दिनी श्रीकृष्णाने मुक्त केल्या ।
१६ सहस्र उपवर कन्या नरकासुराच्या गुलामीतून ।
श्री गुरुच करतील मुक्त मला मनाच्या गुलामीतून ॥

निधन वार्ता

पुणे येथील सनातनचे साधक श्री. जगदीश जाधव यांचे वडील श्री. कोंडीभाऊ काशिनाथ जाधव (वय ७३ वर्षे) यांचे १४ नोव्हेंबर या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मालवण येथे आज श्री देव रामेश्‍वर आणि श्री देव नारायण यांचा ऐतिहासिक पालखी सोहळा 

मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण आणि श्री देव रामेश्‍वर यांच्या वार्षिक पालखी सोहळ्याला सोमवार, १६ नोव्हेंबर २०२० या दिवशी दुपारी १२ वाजता देऊळवाडा येथील श्री देव रामेश्‍वर मंदिर येथून प्रारंभ होणार आहे.

उभादांडा, वेंगुर्ले येथील श्री गणेश मंदिरात श्री गणेशमूर्तीची स्थापना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावात आगळीवेगळी परंपरा असलेले एक श्री गणेश मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंदिरात प्रतीवर्षी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीपासून सिद्ध केलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते.

हज यात्रेला जाण्यासाठी दाबोळी विमानतळ पुन्हा प्रारंभस्थळ बनवण्याची मुसलमान संघटनांची मागणी

गोव्यातून हज यात्रेला जाणार्‍यांसाठी दाबोळी विमानतळ हे प्रारंभस्थळ बनवण्याचा प्रस्ताव रहित करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाचा अनेक मुसलमान संघटनांनी विरोध केला आहे.