‘होय हिंदूच’ संघटनेकडून ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ !

सिंहगडावर येणार्‍या काही पर्यटकांकडून गडावर मद्यपान करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे आदी अपप्रकार झाल्याने गडाचे पावित्र्य भंग होते. अशा अपप्रकारांना आळा बसावा, यासाठी ‘होय हिंदूच’ संघटनेकडून २४ जुलै या दिवशी ‘सिंहगड पावित्र्य खडा पहारा मोहीम’ राबवण्यात आली.

बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी नको म्हणून सासरच्या लोकांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातून मागील ७ मासांत ८४० युवती आणि महिला बेपत्ता !

राज्यातील काही जिल्ह्यांतून एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला किंवा युवती बेपत्ता होणे चिंताजनक आहे ! सरकारने याविषयी सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींना कारागृहात टाकावे !

उमेश कोल्हे यांच्या हत्येतील आरोपीवर कारागृहात आक्रमण: ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मुंबई – भाजपच्या नेत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांवर ‘पोस्ट’ प्रसारित करणारे अमरावती येथील पशूवैद्यकीय औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शाहरूख पठाण तथा बादशाह हिदायत खान याच्यावर आर्थर रोड कारागृहात आक्रमण झाले. या प्रकरणी पोलिसांनी बंदीवान कल्पेश पटेल, हेमंत मनियार, अरविंद यादव, संदीप जाधव, श्रवण आवणे यांसह ७ जणांविरुद्ध … Read more

शाडूच्या नावाखाली प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींची विक्री

मूर्तीकारांना जुजबी प्रतिमूर्ती १०० रुपये अनुदान दिल्यावर राज्यातील मूर्तीकारांच्या संख्येत घट न झाल्यासच नवल ! याला गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु उद्योग विकास महामंडळालाच उत्तरदायी का धरू नये ?

दुहेरी नागरिकत्वाच्या निकषांविषयी गोव्यात शासकीय स्तरावर अजूनही सुस्पष्टता नाही !

गोव्यात दुहेरी नागरिकत्वाचे एकही प्रकरण नसल्याची माहिती दोन्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. गोव्यातील दुहेरी नागरिकत्वाच्या प्रकरणात लवकर अन्वेषण करून अहवाल देण्याचा आदेश केंद्रीय  गृहमंत्रालयाने राज्यशासनाला नुकताच दिला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ९ ते १७ ऑगस्ट ‘स्वराज्य महोत्सव’ ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मोहिमेत जिल्ह्यासाठी ६ लाख ३ सहस्र राष्ट्रध्वज लागतील. नागरिकांनी ९०० मिमी बाय ६०० मिमी आणि ४५० बाय ३०० मिमीचे ध्वज घरावर लावावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.’’

कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणार !

चंदगड तालुक्यातील कुदनूर या गावात २३ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. हा पुतळा साडेचार टन वजनाचा असून तो लोकवर्गणीतून उभारण्यात येणार आहे.

‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन !

दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करतात. मुळात गटारी असा काही सण हिंदु धर्मात नाही. तरी शहरात ठिकठिकाणी ‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन करण्यात येत आहे.

सोलापूर येथे वाहतुकीचे नियम तोडणार्‍या २२ शालेय बस जप्त !

सोलापूर आणि अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून विविध भागांत कारवाई करण्यात आली. शालेय बसचालकांना दंड करून त्यांच्याकडून २ लाख ७५ सहस्र ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.