सिंधुदुर्गात २२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या १९६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत.

गोव्यातील खाणी चालू करण्याविषयी शासन गंभीर ! – प्रल्हाद जोशी, केंद्रीय खाणमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर गोव्यातील खाणी बंद झाल्या आहेत.

मोरजी (गोवा) येथील अनेक भूखंड देहली येथील बांधकाम व्यावसायिक आणि रशियाचे नागरिक यांच्या कह्यात !

मोरजीतील भूखंड परप्रांतीय आणि विदेशी यांच्या कह्यात जात असतांना स्वतःला ‘गोमंतकियांसाठी झटणार्‍या’ म्हणणार्‍या संघटना गप्प का ?

परिस्थिती पाहून ८ ते १० दिवसांमध्ये दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

दिवाळीच्या कालावधीत रस्त्यांवर झालेल्या गर्दीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच तज्ञांकडून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे पुढील ८ ते १० दिवसांमध्ये परिस्थिती पाहून दळणवळण बंदीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी दिली.

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

बिहारमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश येथे लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येत आहे.

गाडीवर ‘प्रेस’चे ‘स्टिकर’ लावून गांजाची वाहतूक करणार्‍या २ सराईत गुन्हेगारांना पुण्यातून अटक

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीच्या काचेवर ‘प्रेस’चे ‘स्टिकर’ तसेच ‘निळा प्रहार स्पेशल फोरम तालुका अध्यक्ष’ या नावाचे स्टिकर लावून गांजाची वाहतूक करणार्‍या रवींद्र योसेफ आढाव आणि गोरक्षनाथ लक्ष्मण दहातोंडे यांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

गुन्हा रहित करण्यासाठी कंगनाची न्यायालयात याचिका

सामाजिक माध्यमातून द्वेषमूलक ‘पोस्ट’ केल्याप्रकरणी वांद्रे महानगर दंडाधिकार्‍यांनी मुंबई पोलिसांना कंगना राणावत आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला कंगना आणि रंगोली यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

भरमसाठ वीजदेयक आकारल्याच्या निषेधार्थ भाजपकडून राज्यभर वीजदेयकांची होळी

कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात असतांना दळणवळण बंदीच्या काळात ग्राहकांना भरमसाठ वीजदेयके दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभर वीजदेयकांची होळी करण्यात आली.

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे श्री सिद्धनाथांचे उभ्या नवरात्राचे व्रत चालू

दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड (जिल्हा सातारा) येथील श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्‍वरी यांच्या शाही विवाहसोहळ्याची धामधूम चालू झाली आहे. दिवाळी पाडवा ते तुळशी विवाह या १२ दिवसांच्या कालावधीत पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उभ्या नवरात्रीचे कडक व्रत चालू झाले आहे.

वेळेत दोषारोपपत्र सादर न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई न झाल्यास मोर्चा काढू ! – मनसेची चेतावणी

सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे