‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन !

सांगली, २६ जुलै (वार्ता.) – दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करतात. मुळात गटारी असा काही सण हिंदु धर्मात नाही. तरी शहरात ठिकठिकाणी ‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन करण्यात येत आहे. ‘आपणच राखूया सन्मान आपल्या हिंदु सणांचा’, असे आवाहन या फलकांद्वारे करण्यात येत आहे. ‘या संदर्भात सामाजिक माध्यमांवर चलचित्र सिद्ध (व्हिडिओ) करून त्याद्वारेही प्रबोधन करण्यात येत आहे’, असे श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले यांनी सांगितले. (धर्मप्रबोधन करणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे अभिनंदन ! – संपादक)