गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर येथील ‘बी.आर्. न्यूज’ वाहिनीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन !

या कार्यक्रमात ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व काय ?’, ‘जीवनातील गुरूंचे महत्त्व’, ‘गुरुपरंपरेमुळे समाजाला झालेला लाभ’ यांविषयी माहिती देण्यात आली आहे. सोलापूरवासियांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मिलिंद चवंडके लिखित ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या ग्रंथास भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद !

५ भाषांमध्ये नवनाथांची ओवीबद्ध ग्रंथनिर्मिती करण्याची मागणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ग्रंथ निर्मितीस निधी मिळावा !

अमरावती येथील अब्दुल नदीम अब्दुल मजीद याच्याविरुद्ध ‘एम्.पी.डी.ए.’ची कारवाई !

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

कोल्हापूर जिल्ह्यात २ दिवसांपासून संततधार पावसाने पंचगंगा ३२ फुटांवर !

गेले २ दिवस चालू असलेल्या संततधार पावसाने पंचगंगा नदीच्या पाणीची पातळी ३२ फूट ७ इंच इतकी झाली आहे. राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरण ५७.६७ टक्के भरले आहे.

सुप्रसिद्ध निरूपणकार सौ. धनश्री लेले यांचे ‘ज्ञानेश्वरीतील काव्य आणि विचारसौंदर्य’ यावर व्याख्यान पार पडले !

‘भगवद्गीता हा जरी कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश असला, तरी संत ज्ञानेश्वर माऊलींनी तरल कवीमनाने त्याची मांडणी ज्ञानेश्वरीतून केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस !

‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांना सहभागी करून घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भूवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

(म्हणे) ‘सरकारी कार्यालयात घातलेली सत्यनारायणाची पूजा ही घटनेची पायमल्ली !’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घातलेली सत्यनारायणाची पूजा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्त्वाची पायमल्ली आहे, अशी दर्पाेक्ती पुणे येथील मानवी हक्क कार्यकर्ते अधिवक्ता विकास शिंदे यांनी केली.

कोल्हापुरातील शिवसेना कार्यकारिणी विसर्जित !

कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणीत पालट करण्यात आला आहे, तसेच जुनी कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपूर्वी नवी कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी दिली.

महावितरणच्या बनावट कर्मचार्‍याने महिलेला लुटले !

५३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.