विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करण्यावर प्रतिबंध आणण्याच्या प्रश्नावरून विधान परिषदेत गदारोळ !

संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, ‘या विषयावर आचारसंहितेसंबंधी बैठक घेण्यात येईल’, असे सांगितले. यानंतर सभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी विधीमंडळ सचिवालयाचे परिपत्रक वाचून दाखवले.

स्पर्धा परीक्षेत निवड होऊन साडेतीन वर्षे नियुक्ती नाही !

असे आंदोलन का करावे लागते ? साडतीन वर्षे नियुक्ती न झाल्यामुळे उमेदवारांची झालेली हानी सरकार भरून देणार का ?

पोलीस भरती घोटाळ्यातील ६ रॅकेट उद्ध्वस्त !

अशा पद्धतीने भरती झालेल्या पोलिसांकडून नैतिकता आणि नीतिमत्तेची काय अपेक्षा करणार ?

कृष्णा नदीत सातत्याने होणार्‍या माशांच्या मृत्यूप्रकरणी हरित लवादाने अहवाल मागवला !

कृष्णा नदीतील मासे मृत्यूमुखी पडले होते. या प्रकरणी पडताळणी करण्यासाठी संयुक्त समिती नियुक्तीचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन्.जी.टी.) यांच्या पश्चिम महाराष्ट्र क्षेत्राच्या पुणे खंडपीठाने दिले आहेत.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘एक दिवस बळीराजासोबत’ मोहीम !

सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२२ या ३ मासांत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल विभाग, कृषी,  ग्रामविकास हे विभाग या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

मुंबई महापालिकेचे महालेखा परीक्षकांकडून विशेष ऑडीट करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

महापालिकेतील घोटाळ्यांच्या काही आरोपांची नगरविकास विभागाच्या अधिकार्‍यांकडून चौकशी करण्यात येईल. चौकशीचा फार्स न करता आरोपांची चौकशी कालबद्धतेने पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत केली.

‘वन्दे मातरम्’ म्हणू नका सांगणारे तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहात का ? – एकनाथ शिंदे

ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते ‘वन्दे मातरम्’ म्हणत हसतहसत फासावर गेले. ‘वन्दे मातरम्’ बोलू नका’, असे इंग्रज म्हणायचे. ‘वन्दे मातरम्’ म्हणू नका सांगणारे तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहात का ? असा सडेतोड प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याची सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा !

जिल्हा नियोजन निधीतून ३ वर्षांत यासाठी १ सहस्र कोटी रुपये उपलब्ध होतील, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २५ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.

बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे !

महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. उत्तम विरोधक बनून सहकार्य करावे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ही राज्याची २ चाके आहेत. राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी रुग्णालय सल्लागार समिती गठीत करणार ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईतील रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यांविषयीच्या समस्या  सोडवण्यासाठी सल्लागार समिती कार्य करेल.”