गोवा शासन खाण लीजचा लिलाव करण्याच्या विचारात ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील खाणउद्योग चालू करण्यासाठी गोवा शासन खाण लीजचा लिलाव करण्याच्या विचारात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘गोव्यात खाणी चालू करण्यासाठी शासनाकडे ‘मायनिंग कॉर्पोरेशन’ (खाण महामंडळ) सिद्ध करणे, हा एक पर्याय आहे. मी येथील ‘मिनरल एक्सपोर्ट्स असोसिएशनशी’ ‘त्यांचा काय विचार आहे ?’, याविषयी बोलणी करणार आहे.’’ गोव्यातील खाणविषयक प्रश्‍नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच देहली येथील केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती.