पणजी, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यातील वीज खात्याकडून ज्या ग्राहकांची देयके भरणे प्रलंबित आहेत, अशांसाठी ‘ऑनलाईन’ एकरकमी (ओ.टी.एस.- वन टाईम सेेटलमेंट) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेखाली ग्राहकांना त्यांची प्रलंबित देयके पूर्णतः किंवा अंशतः भरता येतील. या योजनेखाली देयके विलंबाने भरण्याविषयीच्या शुल्कामध्ये सूट देण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी २९ नोव्हेंबरला ही योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या ग्राहकांना वीज खात्याच्या https:/www.goaelectricity.gov.in या संकेतस्थळाचा उपयोग करून वीजदेयके भरता येतील. वीज ग्राहकांसाठी ही योजना १ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत चालू राहील. ज्या ग्राहकांची देयके प्रलंबित आहेत, त्यांनी देयकाची मूळ रक्कम भरल्यानंतर किती हप्त्यांमध्ये वीजदेयके भरणार, त्या कालावधीनुसार विलंबाने भरणा केल्याविषयीच्या शुल्कात सूट दिली जाईल.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > विजेची प्रलंबित देयके भरण्याविषयी वीज खात्याकडून एकरकमी (ओटीएस्) योजना
विजेची प्रलंबित देयके भरण्याविषयी वीज खात्याकडून एकरकमी (ओटीएस्) योजना
नूतन लेख
- बजरंग दलाने तीव्र आक्षेप घेतल्यानंतर गणेशोत्सव मंडळाने विडंबनात्मक श्री गणेशमूर्तीचे केले विसर्जन !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सांगवी (पिंपरी) येथे कोयत्याने तिघांवर वार ! ,पुणे येथे चिमुकल्यावर कुत्र्यांचे आक्रमण !..
- आरक्षणाविषयीच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसेनेकडून राहुल गांधीच्या चित्राला ‘जोडे मारा’ आंदोलन !
- ऑगस्टमध्ये एस्.टी. महामंडळ प्रथमच १६.८६ कोटी रुपयाने लाभात !
- ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची बजरंग दलाची मागणी
- पुणे महापालिकेचे भाविकांना हौदामध्ये विसर्जन करण्याचे किंवा मूर्तीदान करण्याचे आवाहन !