ओडिशामध्ये मद्यपान आणि तंबाखू यांच्या सेवनात महिलांच्या संख्येत वाढ, तर पुरुषांच्या संख्येत घट ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

ज्या महिलांनी घरामध्ये संस्कार करायचे, त्याच व्यसन करत असतील, तर मुलांवर संस्कार कोण करणार ?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तरप्रदेश सरकारकडून दंगलखोरांकडून हानी भरपार्ई वसूल करण्याची प्रक्रिया रहित

सर्वोच्च न्यायालयाने वसुली रहित करण्याचा आदेश दिला. त्याच वेळी न्यायालयाने ‘सरकार नव्या कायद्यानुसार कारवाई करू शकते’, असेही म्हटले आहे.

(म्हणे) ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये तरी हिजाब घालण्याची अनुमती द्या !’  

आता पुढे जाऊन ‘शुक्रवारी नमाजपठण करण्यासाठी वेळ द्या’, अशीही मागणी केली जाईल, हे लक्षात घ्या !

उज्जैन येथील हिंदु महिलेने बुरखा घालून महाकाल मंदिरात घेतले दर्शन !

मंदिरात दर्शन कसे घ्यावे, हेही हिंदूंना ठाऊक नाही. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते अशा प्रकारची कृती करत आहेत. हिंदु राष्ट्रात प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण दिले जाईल !

द्वेषाचे प्रतीक असलेल्या व्यक्तीला मी उत्तर देणार नाही !

हिजाबला विरोध केल्याने असदुद्दीन ओवैसी यांची तस्लिमा नसरीन यांच्यावर टीका

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंत्रिमंडळाकडून पूर्णत: मान्यता ! – शिक्षणमंत्री उदय सामंत

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमीपूजन होऊ शकले नाही.

सहारणपूर (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या कार्यालयांच्या जवळून बनावट नोटा जप्त

पोलिसांनी ऋषिपाल अन् ललित या दोन तरुणांना बनावट नोटांसह अटक केली. त्यांच्याकडे २ सहस्र रुपये मूल्यांच्या १२ बनावट नोटा सापडल्या.

उच्च न्यायालयांनी इतर मते मांडण्याऐवजी केवळ खटल्यापुरतेच बोलावे !

देहली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेविषयी निरीक्षणे नोंदवली होती. त्यावर केंद्र सरकारने आक्षेप घेतला. ती निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने हटवत उच्च न्यायालयांना वरील सल्ला दिला.

३८ जणांना फाशी, तर ११ जणांना आजन्म कारावास

कर्णावती (गुजरात) येथे वर्ष २००८ मधील २१ साखळी बाँबस्फोटांचे प्रकरण
बाँबस्फोटासारख्या प्रकरणी १४ वर्षांनंतर निकाल लागणे, हा न्याय नसून अन्यायच म्हणावा लागेल ! अशांमुळेच जिहादी आतंकवादी आणि गुन्हेगार यांचे फावते !

जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासिन भटकळच्या तत्कालीन अधिवक्त्यांना ‘इसिस’ची धमकी !

आतंकवाद्यांचे वकीलपत्र घेणार्‍यांना आतातरी आतंकवादाच्या तीव्रतेची जाणीव होणार का ?