(म्हणे) ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये तरी हिजाब घालण्याची अनुमती द्या !’  

 मुसलमान विद्यार्थिंनीची कर्नाटक उच्च न्यायालयाकडे नवी मागणी

  • आता पुढे जाऊन ‘शुक्रवारी नमाजपठण करण्यासाठी वेळ द्या’, अशीही मागणी केली जाईल, हे लक्षात घ्या !
  • शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाब घालून येण्याची अनुमती देण्याची मागणी करणारे ‘मशिदींमध्ये नमाजपठण करण्याची अनुमती द्या’, अशी कधी मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाबच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी चालू असतांना आता ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये हिजाब घालण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी करणारी नवी याचिका विद्यार्थिनींकडून प्रविष्ट करण्यात आली आहे.

यावर न्यायालयाने ‘आम्ही यावर विचार करू’, असे म्हटले आहे.