संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून बुरखाधारी मुस्कान खान हिचे समर्थन

‘‘आम्ही कोणत्याही धार्मिक उन्मादाचे समर्थन करत नाही. प्रत्येक संस्थेचा गणवेश असतो. तेथे हिजाब किंवा अन्य काही चालत नाही आणि ते योग्यही नाही. काही कट्टरतावादी लोक मुलींचा उपयोग करून वाद निर्माण करून शांतता बिघडवत आहेत.’’

जयपूर (राजस्थान) येथे ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍यास फाशीची शिक्षा

या मुलीवर बलात्कार करून तिला तलावमध्ये बुडवून तिची हत्या करण्यात आली होती. अशा घटनांमध्ये आरोपीला हीच शिक्षा योग्य आहे !

देहलीतील काँग्रेस मुख्यालयाचे १२ लाख ६९ सहस्र रुपयांचे भाडे थकित !

सरकारचे लाखो रुपयांचे भाडे थकित ठेवणार्‍या पक्षावर अद्याप केंद्र सरकारने कारवाई का केली नाही ?, याचे उत्तर त्याने जनतेला दिले पाहिजे ! सामान्य व्यक्तीला इतक्या मोठ्या प्रमाणात भाडे थकवता आले असते का ? प्रशासनाने कधीच अशा व्यक्तीला बाहेर काढले असते !

धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न चालू आहे ! – मद्रास उच्च न्यायालय

हे खरोखर धक्कादायक आहे की, काही लोक हिजाबच्या बाजूने आहेत, काही टोपीच्या बाजूने आहेत, तर काही इतर गोष्टींच्या बाजूने आहेत. हा देश एकसंघ आहे कि धर्माच्या आधारावर विभागला गेला आहे ?

हिजाबचे प्रकरण राष्ट्रीय सूत्र बनवू नका ! – सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला

कर्नाटकातील हिजाब प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ११ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा सुनावणी झाली. ‘आम्ही योग्य वेळी या याचिकेवर सुनावणी करू. तुम्ही हे राष्ट्रीय सूत्र बनवू नका’, असे न्यायालयाने सांगितले.

हरिहर (कर्नाटक) येथे ३०० हून अधिक धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु दुकानदाराला मारहाण

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना धर्मांधांकडून अशा प्रकारे मारहाण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! अशा धर्मांधांवर आता कारवाई होऊन त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

‘सुदर्शन टीव्ही’चे संपादक सुरेश चव्हाणके यांना संरक्षण द्या !  

देशात एकतरी धर्मांध नेत्याला असे संरक्षणात रहावे लागते का ? हिंदूंना ‘असहिष्णु’, ‘तालिबानी’, ‘भगवे आतंकवादी’ म्हणणारे याचे उत्तर देतील का ?

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील महाविद्यालयातही हिजाबला विरोध करण्यात येत असल्याचा मुसलमान विद्यार्थिनीचा आरोप

आता संपूर्ण देशात जाणीवपूर्वक हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करण्यात येतील, हे लक्षात घ्या ! हिजाबच्या नावाखाली चालू असलेले षड्यंत्र जाणा !

मुंबईतील एका महाविद्यालयात पूर्वीपासूनच हिजाबवर बंदी !

एखाद्या ठिकाणी पूर्वीपासून हिजाबवर बंदी असतांना कुणी आकांडतांडव केला नाही, मग यावरून आताच पोटशूळ उठण्यामागे धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा हेतू तर नव्हे ना ? याची अन्वेषण यंत्रणांनी पडताळणी केली पाहिजे !

केरळमध्ये ‘केरळमधील माजी मुसलमान’ नावाच्या संघटनेची स्थापना !

अशी वृत्ते देशातील प्रसारमाध्यमे का प्रकाशित करत नाहीत ? कि अशा बातम्या छापल्यास त्यांच्या कथित धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का लागणार, असे त्यांना वाटते का ? भारताचे इस्लामीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी हिंदूसंघटन अपरिहार्य !