‘जिन्न’च्या सांगण्यावरून बुरखा घातल्याचा दावा !
मंदिरात दर्शन कसे घ्यावे, हेही हिंदूंना ठाऊक नाही. हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ते अशा प्रकारची कृती करत आहेत. हिंदु राष्ट्रात प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण दिले जाईल ! – संपादक
उज्जैन (मध्यप्रदेश) – राजस्थानच्या भिलवाडा येथे राहणारी लक्ष्मी नावाची महिला तिचे नातेवाईक किशन, वडील दालचंद आणि आई येथील महाकाल मंदिरात दर्शनासाठी आले होते. या वेळी लक्ष्मी यांनी बुरखा घातला होता. ‘जिन्न’च्या (एक प्रकारचे भूत) सांगण्यावरून बुरखा घालून मंदिरात आल्याचे सांगितल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तिची चौकशी केली, तसचे अधिकार्यांशी चर्चा करून तिला मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ दिले.
महाकाल मंदिर में एक महिला बुर्का पहनकर दर्शन करने पहुंची थी। https://t.co/vI1B0d3xKe
— Jansatta (@Jansatta) February 17, 2022