(म्हणे) चिनी सैन्याकडे कोणत्याही घुसखोराला पराजित करण्याची शक्ती !

चीनच्या नागरिकांना शांती हवी आहे. आम्ही कोणावरही आक्रमण करणार नाही आणि स्वतःचा विस्तार करणार नाही; मात्र आमच्या सैन्यात कोणत्याही घुसखोराला रोखण्याची शक्ती आहे, असे विधान चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताचे नाव न घेता केले आहे.

जर्मनीमधील नाईट क्लबमध्ये इराकी नागरिकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

जर्मनीच्या कान्सटान्स या शहरातील एका नाईट क्लबमध्ये ३४ वर्षांच्या इराकी नागरिकाने गोळीबार केला.

अमेरिकेच्या ७५५ राजनैतिक अधिकार्‍यांना रशियातून निघून जाण्याचा पुतिन यांचा आदेश

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असले, तरी पुतिन यांनी अमेरिकेचे राजनैतिक अधिकारी आणि कर्मचारी यांना रशिया सोडून जाण्याचा आदेश दिला आहे.

चीनकडून उत्तराखंडातील चमोली येथे घुसखोरीचा प्रयत्न

भारत आणि चीन यांच्यात डोकलाम तिढ्यावरून तणाव निर्माण झालेला असतांनाच चीनकडून २६ जुलैच्या दिवशी उत्तराखंडातील चमोली येथे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चमोली जिल्ह्यातील बाराहोटी येथे चीनचे सैनिक एक किलोमीटर आत घुसले

इटलीमध्ये मुसलमान शरणार्थींना प्रवेश देण्यावर बंदी घाला ! – रोमच्या महापौरांची सरकारकडे मागणी

रोम शहराच्या महापौर व्हर्जिनिया रॅगी यांनी शहरात येणार्‍या विस्थापित मुसलमान शरणार्थींना त्यांच्या देशात प्रवेश देण्यावर तात्काळ बंदी आणण्याची मागणी इटली सरकारकडे केली आहे. रोमवर आक्रमण करण्याचे इसिसचे लक्ष्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हॅम्बर्ग (जर्मनी) येथे शरणार्थी मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात एक जण ठार

एका मुसलमानाने येथील सुपरमार्केटमध्ये अल्लहू अकबरची घोषणा देत दुकानदारांवर चाकूने आक्रमण केले. यात एक जण ठार, तर ६ जण घायाळ झाले.

युद्धासाठी सिद्ध रहा ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

भूतान, भारत आणि चीन यांच्या सीमेवरील डोकलाम तिठ्यावरून भारत अन् चीन यांच्यामध्ये चालू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनने डोकलामच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव चालू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘युद्धासाठी सिद्ध रहा’, असा आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्याला दिला आहे.

श्रीलंकेने हंबनटोटा बंदर चीनला विकले

श्रीलंकेने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे हंबनटोटा बंदर चीनच्या एका सरकारी आस्थापनाला ७२ अब्ज रुपयांना विकले आहे. या आस्थापनाची या बंदरामध्ये ७० टक्के भागीदारी असणार आहे.

ब्रिटनमध्ये मुसलमान महिलेला मारहाण

ब्रिटनमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून गेल्या काही मासांत झालेल्या आक्रमणामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून संशयाचा सामना करावा लागला ! – अमेरिकी मुसलमान

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून आम्हाला मोठ्या प्रमाणावर संशयाचा सामना करावा लागला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now