पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने निज्जर याची हत्या केल्याचा संशय !

अमली पदार्थांच्या व्यवसायातून हत्या झाल्याची शक्यता !

हरदीप सिंह निज्जर

नवी देहली – कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केल्यापासून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने निज्जर याची हत्या केल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. ‘भारताला अडचणीत आणण्यासाठी आय.एस्.आय. निज्जर याला ठार करू इच्छित होती’, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या कॅनडामध्ये राहत राव आणि तारिक कियानी हे आय.एस्.आय.चे हस्तक कार्यरत आहेत. त्यांनी निज्जर याची हत्या करण्यामागे व्यावसायिक आणि अमली पदार्थ हे कारण असावे, असे म्हटले जात आहे. राव आणि कियानी यांचे स्थानिक अमली पदार्थ व्यवसायावर थेट नियंत्रण रहावे म्हणून निज्जर याची हत्या करण्याचे काम यांपैकी एकाला देण्यात आले असावे, अशी माहिती समोर आली आहे.

संपादकीय भूमिका

  • जर हे खरे असेल, तर जस्टिन ट्रुडो यांनी भारताची जाहीररित्या क्षमा मागितली पाहिजे आणि पाकला यासाठी दोषी ठरवत त्याच्या विरोधात कृती केली पाहिजे !