इराक आणि सौदी अरेबिया येथील कारागृहे पाकिस्तान्यांमुळे भरली !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – परदेशात पकडण्यात आलेल्या भिकार्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९० टक्के भिकारी हे पाकिस्तानी नागरिक असतात, अशी माहिती स्वतः पाकनेच दिली आहे.
सौजन्य विऑन
पाकिस्तानच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव जुल्फिकार हैदर यांनी सांगितले की, विदेशात पकडण्यात येणार्या भिकार्यांमध्ये पाकिस्तान्यांची संख्या सर्वाधिक म्हजणे ९० टक्के इतकी आहे. इराक आणि सौदी अरेबिया यांच्या राजदूतांनी कळवले, ‘अशा पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यासाठी आमच्याकडे कारागृहात जागा शिल्लक राहिलेली नाही.’ यामुळे सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाच्या अधिकार्यांनी बैठकीत पाकच्या हज यात्रेकरूंच्या कोट्यांतील नागरिकांविषयी सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे.
मक्केमध्ये पकडलेल्या गेलेल्या पाकीटमारांमध्ये सर्वाधिक पाकिस्तानी !
मक्केतील ‘मस्जिद अल-हरम’ सारख्या पवित्र ठिकाणी पकडण्यात आलेल्या पाकीटमारांमध्ये सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक होते. मध्य-पूर्व देश हे सर्वाधिक पाकीटमार असणारे ठिकाण आहे, असेही या समितीने म्हटले. (स्वतःच्या धर्माच्या अत्यंत पवित्र ठिकाणीही गुन्हेगारी कृत्य करणार्या अशा पाकिस्तानी मुसलमानांना ‘अल्लाचा अवमान केल्यावरून शिक्षा झाली पाहिजे’, अशी मागणी अन्य मुसलमान का करत नाहीत ? – संपादक)
सौदी अरेबियाचा पाकच्या कामगारांवर विश्वास नाही !
पाकिस्तानातील पाकीटमार आणि भिकारी नागरिक हज यात्रा करण्याच्या नावावर व्हिसा घेऊन सौदी अरेबियामध्ये येत असल्याने सौदी अरेबिया पाकवर अप्रसन्न आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना सौदी अरेबियामध्ये कामासाठी बोलावले जात नाही; कारण कुशल कामगारांच्या संदर्भात सौदीच्या नागरिकांचा पाकिस्तान्यांवर विश्वास नाही. कुशल कामगारांसाठी सौदी अरेबिया नेहमीच भारतीय आणि बांगलादेशी कामगारांवर अबलंबून असतो.
संपादकीय भूमिका
|