लाहोर (पाकिस्तान) येथे ३ मास बलात्कार करणार्‍या वडिलांना अल्पवयीन मुलीने गोळ्या झाडून केले ठार !

असे विकृत लोक अन्य धर्मियांच्या मुली, तरुणी आणि महिला यांच्या समवेत कसे वागत असतील, हे लक्षात येते !

कॅनडाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदूंचे महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचे नेहमीच स्वागत आहे !

कॅनडाच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही भीतीविना देशात रहाण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक समुदायाचे या देशात स्वागत आहे. आम्ही हिंदूंविरुद्ध आक्षेपार्ह विधाने नुकतीच ऐकली असून त्यांस आम्ही विरोध करतो. हिंदूंनी देशातील प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. कॅनडामध्ये हिंदूंंचे नेहमीच स्वागत आहे.

पाकिस्तानने अनधिकृतरित्या कह्यात घेतलेली भारताची भूमी रिकामी करावी !

पाकिस्तानने आतंकवादाच्या विरोधात कारवाई करावी आणि सीमेवर आतंकवादाला प्रोत्साहन देणे थांबवावे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचे होणारे उल्लंघन थांबले पाहिजे.

जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली असून ते हवेत गोळीबार करत आहेत ! – मायकेल रुबिन, अमेरिकेचे माजी अधिकारी

मला वाटते पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फार मोठी चूक केली आहे. त्यांनी अशा पद्धतीने भारतावर आरोप केले आहेत, ज्याचे पुरावे त्यांना अद्याप सादर करता आलेले नाहीत.

कॅनडामध्ये भारतियांमुळे अर्थव्यवस्थेला मिळतात ३ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसे !

खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यात वाद निर्माण झाला आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचे सध्या थांबवले आहे. या निर्णयामुळे कॅनडातील अर्थतज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

निज्जर याच्या हत्येचे पुरावे काही आठवड्यांपूर्वी भारताला दिले !

काय पुरावे दिले, हे ट्रुडो जगजाहीर का करत नाहीत ?

पाकिस्तानमध्ये शिखांना ठार मारण्याची धर्मांध मुसलमानांची धमकी !

खलिस्तानची मागणी करणारे याविषयी तोंड उघडतील का ? कॅनडातून हिंदूंना हाकलण्याची धमकी देणारे खलिस्तानी पाकच्या विरोधात का बोलत नाहीत ?

इस्लामी देश इंडोनेशियामध्ये डुकराचे मांस असलेला पदार्थ खाणार्‍या हिंदु महिलेला २ वर्षांचा कारावास !

हिंदूबहुल भारतात गोमांस खाणार्‍यांना अशी शिक्षा कधी होणार ?

(म्हणे) ‘खलिस्तानी नेत्याच्या हत्येचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे !’-जस्टिन ट्रुडो

हत्या कॅनडात झाली आहे. याला ३ मास होत आले असतांना अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याचा अर्थ कॅनडा याविषयी गंभीर नाही किंवा तेथील पोलिसांची क्षमता नाही.

कॅनडामध्ये आता निवडणुका झाल्या, तर जस्टिन ट्रुडो यांचा होणार पराभव !

 ‘इप्सोस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डैरेल ब्रिकर म्हणाले की, कॅनडात कंजर्व्हेटिव्ह पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकते. देशाच्या दिशेवरून असंतोष असल्याचे या सर्वेक्षणावरून दिसून येते.