काणकोण तालुक्यातील तिर्वाळ-मार्ली या रस्त्याला गोवा मुक्तीनंतर तब्बल ६० वर्षांनी संमती

मार्ली हा काणकोण तालुक्यातील अत्यंत मागास भागातील वाडा असून येथील विद्यार्थी, आजारी आणि वयोवृद्ध व्यक्ती यांना येथील खड्डेमय रस्ता आणि वाहतूक व्यवस्थेचा अभाव यांमुळे पुष्कळ त्रास होतात.

१ जानेवारीपासून पंचायतींना समान ‘कॅडर’

राज्यातील पंचायतींना १ जानेवारीपासून समान ‘कॅडर’ लागू केला जाणार आहे. यामुळे पंचायत संचालकांना एका पंचायत कार्यालयातील कर्मचार्‍याला दुसर्‍या पंचायत कार्यालयात स्थलांतर करणे शक्य होणार आहे.

जि.पं. सदस्य सिद्धेश श्रीपाद नाईक यांची सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक यांनी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांच्या विरोधात पणजी पोलीस, सायबर गुन्हे विभाग आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालय यां ठिकाणी तक्रार नोंदवली आहे.

शंखवाळी तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिरात ३० डिसेंबरला ह.भ.प. सुहासबुवा वझे यांचा नामस्मरणाचा कार्यक्रम

सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गा मंदिरात ३० डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे आणि साथी कलाकार यांच्या नामस्मरणाचा कार्यक्रम होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

‘ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा आणि बक्षीस मिळवा’ राष्ट्रवादीच्या आमदारांचा या योजनेचा उद्देश चांगला असला, तरी हेतू मात्र राजकीय आहे. विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा वाद आणखी चिघळणार आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्यास निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यात्रा पोलिसांनी रोखली 

कडकनाथ संघर्ष यात्रा रोखतांना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलीस यांची झटापट झाली.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे.

चारकोप (मुंबई) येथील मंदिराला लागलेल्या भीषण आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू

कांदिवलीतील साईबाबा मंदिरात ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

२५ वर्षांपूर्वी नगरसेविका म्हणून लक्षणीय काम केलेल्या प्राचार्या वैद्या रूपा शहा यांना ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्कार प्रदान 

नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे, हा पायंडा शहा यांनी पाडला आहे.

अकलूज (जिल्हा सोलापूर) येथे पार पडली युवासेनेची आढावा बैठक 

युवासेना कोअर कमिटीत ‘गाव तिथे शाखा; बूथ तिथे युथ’ ही संकल्पना सांगितली.