
सांगली, २१ फेब्रुवारी – शिवछत्रपतींचे कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व आजही समस्त भारतीय लोकांना प्रेरणादायी ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा अग्रभागी ठेवली जाते. याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानून संघाचे काम चालू आहे. संघाचे काम सर्व देशभरात वाढवण्यात पू. गोळवलकर गुरुजींचे योगदान महत्त्वाचे आहे. या दोन महान महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो, असे प्रतिपादन भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले.
१९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी यांची जयंती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय परिषद सदस्य प्रकाश बिरजे, गटनेते विनायक सिहांसने, नगरसेवक गजानन मगदूम, संजय कुलकर्णी, विशाल मोरे, रवींद्र बाबर, दरीबा बंडगर यांसह अन्य उपस्थित होते.
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !