पाकने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर लाभ घेतला ! – डोनाल्ड ट्रम्प

पाकने वर्षानुवर्षे अमेरिकेचा भरपूर लाभ घेतला, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकशी आता खर्‍या संबंधांना आरंभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

युद्धखोर अमेरिकेशी चर्चेतून नव्हे, तर युद्धातूनच तोडगा शक्य ! – उत्तर कोरिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धाची ठिणगी उडवली आहे. त्यांनी त्यांच्यातील चिथावणीखोर वृत्ती प्रकट केली आहे. यावर आता चर्चेतून नव्हे, तर केवळ युद्धातूनच तोडगा निघू शकतो.

मेक्सिकोतील ख्रिस्ती धर्मगुरूला ३० अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य करूनही चर्चने त्याला दोषमुक्त ठरवले

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील ख्रिस्ती धर्मगुरु जोस गार्सिया अतौल्फो हा एड्स या दुर्धर आणि संसर्गजन्य रोगापासून बाधित झाला असतांनाही त्याने ५ ते १० वर्षे वयोगटाच्या ३० मुलींवर बलात्कार केला.

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित आस्थापनाकडून श्रीगणेशाचे विडंबन !

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.

पूर्वी हाफीज सईद, हक्कानी नेटवर्क सारखी मंडळी अमेरिकेसाठी ‘डार्लिंग’ होती ! – पाकची स्पष्टोक्ती

हाफीज सईद आणि हक्कानी नेटवर्कसाठी आमच्यावर आरोप करू नका. २० ते ३० वर्षांपूर्वी हीच मंडळी तुमच्यासाठी ‘डार्लिंग’ होती. या मंडळींचा पाहुणचार व्हाइट हाऊसनेच केला होता.

राखिन (म्यानमार) मधील ४० टक्के रोहिंग्या मुसलमानांचे बांगलादेशात पलायन

म्यानमारच्या राखिन प्रांतात रहाणाऱ्यां रोहिंग्या मुसलमानांच्या लोकसंख्येच्या ४० टक्के रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये शरणागती पत्करली आहे,

पाकिस्तानच्या हबिब बँकेला अमेरिकेतील शाखा बंद करण्याचा आणि १ सहस्र ४०० कोटी रुपयांचा दंड भरण्याचा आदेश

पाकिस्तानमधील सर्वांत मोठी खाजगी बँक म्हटल्या जाणार्‍या हबिब बँकेची न्यूयॉर्कमधील शाखा बंद करण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यावरून न्यूयॉर्कमधील आर्थिक विभागाने या बँकेला १ सहस्र ४०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now