अमेरिकेतील भारतियांवर हल्ल्यांचे वाढते प्रकार
वॉशिंग्टन – अमेरिकेतील इंडियाना भागात असलेल्या पज्यू विद्यापिठात शिकणार्या भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची ४ ऑक्टोबरच्या रात्री विद्यापिठाच्याच वसतीगृहात हत्या करण्यात आली. वरुण मनीष छेडा असे या २० वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्या खोलीत रहाणार्या कोरियन विद्यार्थ्याला चौकशीसाठी अटक केली आहे. अन्य एका विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
A 20-year-old Indian-origin student, #VarunManishChheda, was killed in his dormitory in the #US‘s Indiana. His roommate has been taken into custody.@Geeta_Mohan https://t.co/KMn8zjMxFi
— IndiaToday (@IndiaToday) October 6, 2022
वरुण हा मूळचा इंडियानापलीस येथील रहिवासी असून तो पज्यू विद्यापिठात ‘डेटा सायन्स’चा अभ्यास करत होता. वरुणचा मृतदेह आढळल्याची माहिती त्याच्या कोरियन मित्रानेच पोलिसांना दिली. प्राथमिक वैद्यकीय अहवालांनुसार वरुणवर तीक्ष्ण शस्त्रांनी अनेक वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला. विद्यापिठाचे अध्यक्ष मिच डॅनियल्स यांनी या प्रकरणी म्हटले की, वरुणची हत्या ही कल्पनेच्या पलीकडील असून अत्यंत दुर्दैवी आहे. आमचे विचार आणि मन त्याचे कुटुंबीय अन् मित्रपरिवार यांच्यासमवेत आहेत.