पेरू देशात सरकारविरोधी हिंसाचारात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू

लिमा (पेरू) – दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझिल देशात नव्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीवरून झालेल्या हिंसाचारानंतर आता याच खंडातील पेरू देशात सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना झालेल्या हिंसाचाराच्या वेळी सुरक्षादलांनी गोळीबार केल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात एकूण ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांकडून लवकरात लवकर निवडणुका घेण्याची, नवीन राष्ट्रपतींना पदावरून हटवण्याची आणि अटकेत असणारे माजी राष्ट्रपती पेड्रो कॅस्टिलो यांची मुक्तता करण्याची मागणी करण्यात येत आहे. देशद्रोहाच्या आरोपावरून कॅस्टिलो यांना १८ मासांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.