ब्राझिलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे निधन

ब्राझिलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले

ब्रासिलिआ – फुटबॉलचे ३ विश्‍वचषक जिंकणारे ब्राझिलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. विसाव्या शतकातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले वर्ष २०२१ पासून कर्करोगाशी लढा देत होते.


गेल्या मासापासून ते आजारपणामुळे रुग्णालयात भरती होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पेले यांनी जवळपास २ दशके त्यांच्या खेळाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले. पेले यांच्या नेतृत्वाखाली ब्राझिलने वर्ष १९५८, वर्ष १९६२ आणि वर्ष १९७० मध्ये विश्‍वचषक जिंकले होते. त्यांनी ब्राझिलसाठी ७७ गोल केले होते.