अमेरिकेने हेरगिरी करणारा चीनचा फुगा पाडण्याविषयी व्यक्त केली प्रतिक्रिया
वॉशिंग्टन – चीनच्या हेरगिरी करणार्या फुग्याद्वारे अमेरिकेची कुठलीही गोपनीय माहिती मिळवण्यात आली नव्हती, असा खुलासा अमेरिकेने केला. ४ फेबु्रवारी २०२३ या दिवशी अमेरिकेने अलास्का येथे आकाशात हेरगिरी करणारा चीनचा भला मोठा फुगा पाडला होता. या घटनेमुळे अमेरिका आणि चीन यांच्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या तणावामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांना त्यांचा चीनचा दौरा रहित करावा लागला होता.