भारत महाशक्ती बनण्याच्या सिद्धतेत ! – अमेरिका

भारतासमवेतचे द्विपक्षीय संबंध हे अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत. एक वस्तूस्थिती अशी आहे की, मागच्या २० वर्षांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जे संबंध प्रस्थापित झाले, ते इतरांपेक्षा वेगळे आहेत. ते गतीने भक्कम होत गेले.

कॅनडामध्ये वर्ष २०२१ मध्ये १० सहस्रांहून अधिक लोकांनी घेतले इच्छामरण !

कॅनडा येथील कथित सुधारणावादी समाज आणि सरकार यांना अध्यात्मशास्त्र ज्ञात नसल्यामुळे तेथे इच्छामरणाला स्थान आहे. अशाने ते नागरिकांची आध्यात्मिक स्तरावर हाती करत आहेत !

अमेरिकेची राज्यघटना रहित केली पाहिजे ! – डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि वर्ष २०२४ मधील रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केली आहे. त्यात त्यांनी ‘वर्ष २०२० च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझा विजय झाला होता’, असा पुन्हा एकदा दावा केला आहे.

पाकिस्तान, चीन, रशिया, सौदी अरेबिया आदी १२ देशांमध्ये होते धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी ! – अमेरिका

यापूर्वी अमेरिकेने भारताविषयीही अशाच प्रकारचे विधान केले होते. त्यावरून भारताने अमेरिकेला खडसावले होते. त्यामुळे अमेरिकेने आता भारताचे नाव घेतलेले नाही, तर जेथे खर्‍या अर्थाने धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते, अशा काही देशांची नावे घेतली आहे, हे विशेष !

‘गूगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान

भारत माझाच भाग असून त्याला मी माझ्याजवळच ठेवतो ! – सुंदर पिचाई

मनुष्याच्या मेंदूत ‘चिप’ बनवून तो संगणकाशी जोडणार !

ही ‘चिप’ म्हणजे मेंदूला संगणकाशी जोडण्याचा प्रकार आहे. ही चिप माकडाच्या डोक्यात शस्त्रकर्म करून बसवण्यात आली. त्याद्वारे हा माकड मनुष्याप्रमाणे कृती करत असल्याचे प्रयोगातून समोर आले आहे.

चीनच्या सैन्याने भारताच्या सीमेवर बांधली नवीन चौकी ! – अमेरिकेचे खासदार राजा कृष्णमूर्ती

‘चीन भारताच्या सीमेवर काय करत आहे ?’, हे अमेरिकेच्या खासदाराकडून भारताला समजते, हे लज्जास्पद ! भारत सरकारनेच स्वतःहून भारतियांना याची माहिती देणे आवश्यक आहे !

अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने समलैंगिक विवाह विधेयक केले संमत !

या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होताच समलैंगिक विवाहांना मान्यता दिली जाईल. वर्ष २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेत यावर बंदी घातली होती.

चीनमधील सरकारविरोधी आंदोलनाला अमेरिकेचा पाठिंबा

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून चीन सरकारच्या विरोधात, तसेच कोरोनाच्या संदर्भातील धोरणांच्या विरोधात चालू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे.

२६/११ च्या सूत्रधारांना शिक्षा करा !

न्यूयॉर्क येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतियांची निदर्शने !